शुक्रवार, २ जुलै, २०१०

Apple Kheer
माझी छोटी मुलगी आहे. तिला काय खायला दयायच हा प्रश्न मला नेहमी पडतो? दिवस भर तिची चालणारी धावपळ दंगा मस्ती या साठी energy पण तितकीच पाहिजेना? म्हणून तिच्यासाठी Apple Kheer  कराचा विचार केला. Apple मुलांना खाऊ घालण्याचा मस्त मार्ग होता हा. खीर बनली म्हंटल जरा taste करुन बघावी. Believe me ! इतकी छान लागली की मी थोड़ी अजुन बनवली आमच्या दोघासाठी. ही माझी पहिली recipe या ब्लॉग वर. 


साहित्य:
३ लाल मोठे Apples 
तुप ३ TS 
वेलची पावडर 
बदाम तुकडे करुन 
१ लिटर दूध 
कृति :
१. Apples grate करुन घ्या 
२. ऐका pan मधे ३ TS तुप गरम करुन त्यात Apple चा किस घाला.
३. एकीकडे दूध आटवायला ठेवा. १५ min . दूध आटूदया.
४. Apples golden brown होत आले की त्यात आटवलेल दूध घाला.
५. गैस कमी करुन १५ min . शिजू दया.
गरम गरम serve करा.


 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा